November 21, 2024
WALUJ MIDC PS1

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) 

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगर मधील वडगाव कोल्हाटी येथील गुलबराव साहेबराव आडे यांच्या गट नंबर 52/1 के 11 वडगाव कोल्हाटी येथे दुपारच्या सुमारास घरचा लॉक तोडून सुमारे 2 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरी केले होते, या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

आरोपीचा गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी शोध घेतला असता आरोपी  अमोल उर्फ दाद्या धर्मा इगवे वय-32 वर्षे रा.बाजारतळ,उमापुर ता.गेवराई जि.बीड यास दि 23/09/2024 तिसगांव ता.जि.छत्रपती संभाजीनगर येथून संशयावरून ताब्यात घेवून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी यांनी आरोपीला विचारपूस केली असता त्याचा अल्पवयीन साथीदारच्या मदतीने एप्रिल 2024 मध्ये गोलोक सोसायटी वडगांव कोल्हाटी, मे 2024 मध्ये राजस्वप्नपुर्ती नगर तिसगाव परिसर येथे वेगवेगळ्या ठिकाणी दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली. घरफोडी मध्ये चोरी केलेले सोन्याचे दागीने आरोपीने  अनिल रावसाहेब काथवटे वय -50 वर्षे धंदा सोनार/ सोन्याचे दुकान, रा. ब्राम्हणगल्ली,ता.शेवगाव जि.अहमदनगर यास विक्री केले असल्याचे सांगीतले. त्यावरून सदर चोरीचे दागीने घेणाऱ्या आरोपीस ब्राम्हणगल्ली,ता.शेवगाव जि.अहमदनगर येथून ताब्यात घेवून त्याच्याकडून विक्री केले सोन्याचे दागीने एकुण 5,70,000/- किंमतीचे 10 तोळे 8 ग्रँम वजनाचे  ( दोन गुन्हयातील ) आरोपी कडून जप्त केले. सदर आरोपीस नमुद गुन्हयात अटक केली. सदर गुन्हयाचा तपास सपोनि/श्री मनोज शिंदे हे करत असून आरोपीतांना दिनांक 04/10/2024 रोजी सदर आरोपीतांना मा.न्यायालयाने न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजुर केल्याने हर्सुल जेल मध्ये रवाना केले आहे. ही कामगिरी प्रविण पवार, पोलीस आयुक्त, मा.पोलीस उप आयुक्त श्री नितीन बागटे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.महेंद्र देशमुख,यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कृष्णा शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शना खाली सपोनि/ श्री मनोज शिंदे (तपास अधिकारी), पोउपनि/ श्री प्रविण पाथरकर, पोउपनि/श्री दिनेश बन, पोह/विनोद नितनवरे, पोह/बाळासाहेब आंधळे, पोह/ जालिंदर रंधे, पोअं, सुरेश कचे, राजाभाऊ कोल्हे,गणेश सागरे, यशवंत गोबाडे, विशाल पाटील, हनुमान ठोके, नितीन इनामे, समाधान पाटील, यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.  

———–

————-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!