July 7, 2025
0f88abde-620a-4a6b-a021-86ff7fe9f833

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

गंगापुर : लासूरगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या १९९० सालच्या दहावीच्या बॅचचे स्नेहमिलन पार पडले. तब्बल ३५ वर्षांनी एकत्र भेटलेल्या या वर्गमित्रांनी एकमेकांच्या सुखदुःखाची विचारणा केली.
पस्तीस वर्षानंतर अनेकजण एकमेकांना पहिल्यांदा पहात होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक निकम, शिंदे, जोशी, डमाळे, प्रशालेचे मुख्याध्यापक राऊत, महेंद्र देशमुख व वर्गमित्र मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामदास शेजुळ, योगेश शर्मा, रमेश मढीकर, संजय तांबे, संजय मोडके, चांगदेव नांगरे, संजय हुमे, कचरू आगवणे, धनंजय शिंदे, विलास कुलकर्णी, दादासाहेब शेलार, सचिन मुळे, अमर देशमुख, तुकाराम धुदाट, सतीश पडवळ, कैलास निघोटे तसेच सर्वच वर्गमित्रांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी मुख्याध्यापक राऊत सर यांना शाळेच्या विकासासाठी रोख स्वरूपात ११ हजार रुपये रक्कम देण्यात आले.

***


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!