July 7, 2025
WhatsApp Image 2025-05-29 at 10.02.24 PM

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील रांजनगाव शेनपुंजी येथील एकता नगरमध्ये किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या एक तरुणाचा खूण झाल्याची घटना आज दि 29 रोजी उघडीकस आली. याप्रकरणी मयत तरुणाच्या वाडीलच्या फिर्यादिवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात एट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल एकनाथ मोटे रा एकता नगर रांजनगाव शेनपुंजी असे खूण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ मोटे हे एकता नगर रांजनगाव शेनपुंजी येथे त्यांचा घरासमोर घरासमोरच इंद्रीस पठाण यांचे घर असुन त्यांच्या घरच्या बकऱ्या मोटे यांच्या घरासमोर बऱ्याच वेळा लेंड्या टाकत असत त्यामुळे इंद्रीस पठाण व मोटे याच्यात काही दिवासपूर्वी वाद झाला होता. तेव्हापसुन इंद्रीस पठाण चा नातेवाईक गल्लीत राहणारा आशपाक राजु शेख हा या बकऱ्याच्या लेंड्याच्या कारणावरुन विनाकारण वाद घालत होता. आशपाक हा मयत सुनिल यास याच कारणावरुन बरेच वेळा कोणत्याना कोनत्या कारणाने भांडण तक्रारी करून कभी ना कभी एक दिन तुझे खत्म कर दूंगा असे म्हणत होता परंतु त्याला घाबरुन मोटे कुटुंबाने याबाबत कधीही पोलीसात तक्रार केली नव्हती.

दि 26 मे रोजी रात्री साडेआठ वाजता सुनिल व गल्लीतील गोविंद प्रल्हाद भिसे असे त्यांच्या घरासमोर रस्त्याच्या कडेला सहजपणे बोलत बसलो होतो. मोटे यांची पत्नी व सुन  घरात होते. त्यावेळी आशपाक हा एकदम जवळ आला व  सुनिल ची गचांडी धरुन गोविंद  भिसे या दोघांना शिवीगाळ करून मारहान करु लागला व जातीवचात शिव्या देऊन सुनीलाल हातातील कड्याने, लाथा बुक्याने छाती, पोटात, कानाजवळ, गालावर मारहान केली.  त्याच वेळी गोविंद भिसे याला सुद्धा त्याने त्याच्या खिश्यातील कटर बाहेर काढुन गोविंद भिसे च्या डाव्या हातावर मारला तो कटरचा वार वेळीच सावधानी राखुन गोविंदने चुकवण्याचा प्रयत्न केला  आशपाक याच्या मारहानीला घाबरुन गोविंद हा त्याच्या घराकडे पळुन गेला.
त्यानंतरही आशपाक हा  सुनिल यास अजुन मारहान करु लागला. त्यावेळी या मारहानीमुळे सुनिल हा व्याकुळ होवुन जमीनीवर पडला.आवाज ऐकून आई वडील शेजारातील नागरिक यांनी  सुनिल यास अशपाक च्या तावडीतुन सोडविले. मार हानिमुळे सुनीलच्या छातीत व पोटात त्रास होत असल्याने मोटे कुटुंबाने सुनीलवर घरगुतीच विलाज केला. सुनीलची तब्येत ठीक होत नसल्याने  दि 28 मे रोजी सुनीलाल उपचारासाठी शासकिय घाटी दवाखाना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले  त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तपासुन सुनिलला मयत घोषीत केले आहे.याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आशपाक राजु शेख याचा विरोधात एट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे. 

गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात नातेवाईकची मोठी गर्दी –

सुनील मोटे हा मयत झाल्याचे कळताच नातेवाइकांनी पोलिस ठाणे गाठून आरोपीला तत्काल अटक कण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली. परंतु पोस्टमार्टम रीपोर्ट आला नसल्याने पोलिसांना गुन्हा नोंद करता येत नवता, नातेवाईकांचा रोष वाढत असल्याचे दिसतांचा शहरातून क्युआरटी पथक बोलावण्यात आले. त्याच बरोबर सहायक पोलिस आयुक्तांनीही पोलिस ठाण्यात धाव घेतली. शेवटी खुनाचा गुन्हा दाखल झाला.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!