
संतप्त नागरिकांनी सिडको कार्यालयात टाकला कचरा
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग सचतांना दिसत आहे.
त्यात पाऊस पडत असल्याने तो कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील त्रस्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी २९ मे रोजी सकाळी ११ वा. वाळूज येथील सिडको वाळूज कार्यालय गाठून मुख्य प्रवेश द्वारावर कचरा टाकून गांधीगिरी करत अधिकार्यांचे लक्ष केंद्रित केले.सध्या सिडको वाळूज महानगरात कचर्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाढलेल्या काटेरी झाडाझुडुपांच्या आड नागरिक कचरा टाकतात. यामुळे ही काटेरी झुडपे हटविण्याची मागणी करण्यात आली.तसेच नागरी भागात नियमितपणे कचर्याची गाडी येत नाही. यामुळे नागरिक व दुचाकी स्वार हे रस्त्यावर कचरा टाकतात. यामध्ये परिसरातील व्यावसायिक व मास विक्रेते रात्री बेरात्री घाण कचरा टाकून फरार होतात. परिणामी सिडको भागातील सर्व दिशेला मोठ्या प्रमाणात कचरा पसरला आहे. सदरील प्रश्न लक्षात घेऊन, सध्या कार्यरत तुटपुंजी यंत्रणेवर खोपर फोडण्यात आले. अत्यल्प मनुष्यबळामुळे यंत्रणा सक्षम नसल्याचे निदर्शनास आले. येथील सर्वत्र मुख्य रस्त्यांच्या कडेला जागोजागी कचऱ्याचे मोठे ढिग साचले आहे. यामुळे मोकाट जनावरांसह सरपटणारे प्राण्यांची भिती वाढली आहे. याकडे प्रशासनासाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. सद्यस्थितीत नवीन वसाहतीसह वाढती लोकसंख्या याचा विचार पाहता सदरची यंत्रणा तुटपुंजी पडत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. विशेष म्हणजे सिडको प्रशासनाकडे कचरा टाकण्यासाठी स्वतःचे डंपिंग ग्राउंड नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.

सध्या पावसाळा सुरू असून, मुख्य रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा अक्षरशः सडला आहे. यामुळे परिसरात भयंकर रोगराई पसरत आहे. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन, तात्काळ कारवाई करावी. अन्यथा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
यावेळी दत्तात्रय वर्पे, शिवसेना उबाठा गटाच्या तालुका संघटक अनिता पाटील, डॉ संजय सांभाळकर, संदीप लोखंडे, संजय भालेराव, एकनाथ ठोंबरे, भाऊसाहेब गवते, सचिन कासार, शांतीलाल राठोड, दिनेश पाटील आदींची उपस्थिती होती.

सिडकोकडून रस्तावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई –
मागीक काही दिवसांपासून नागरिक रस्तावर कचरा टाकत आहे. त्यामुळे आम्ही त्यांचावर दंडात्मक कारवाई केली असून ज्यांनी दंड भरला नाही त्यांचावर गुन्हे दाखल करण्याचे पत्र पोलिस ठाण्यात देण्यात आल्याचे सिडको वसाहत अधिकारी स्वाती पाटील यांनी सांगितले आहे.
दंडात्मक कारवाईसाठी पोलिसांना दिलेल्या पत्रामध्ये खालील नागरिकांचे नाव –
विनोद सावंत गट नंबर 603, कुसूमबाई संजय पाटील, प्रवीण विजय मगर, जहारसिंग डाखे, गोपाल क्षीरसागर, भगवान पाटील.
*****
-
लाडक्या पत्नीचाच रौद्रावतार! फोन कॉलच्या वादातून नवऱ्यावर चाकू हल्ला
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर
-
ऑर्किड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे MHT-CET परीक्षेत घवघवीत यश
Share Total Views: 18 वाळूज महानगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) बजाजनगर,
-
ESIC रुग्णाकडून अवैध पैसे उकळल्याचा आरोप; हॉस्पिटलने आरोप फेटाळले…
Share Total Views: 57 छत्रपती संभाजीनगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) वाळूज



