Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर – छत्रपती संभाजीनगर मधील बजाजनगरमध्ये पडलेल्या संतोष लड्डा सर्वात मोठ्या दरोड्यातील सहा आरोपीनंतर अजून एकाला पोलिसांनी वडगाव कोल्हाटी येथून अटक केली आहे. देविदास शिंदे असे सातव्या आरोपीचे नाव असून मिळालेल्या माहितीनुसार दरोडा टाकण्यापूर्वी रेकी करण्याचा आरोप शिंदेवर आहे. संतोष लड्डा यांचा घरावर १५ मे रोजी दरोडा पडल्याचे उघड झाले. त्यांनतर पाच आरोपी पकडले गेले, सहाव्या आरोपीचे एनकाउंट झाले, त्यांनतर दि ३० रोजी रात्री पोलिसांनी देविदास शिंदेला वडगाव कोल्हाटी येथून अटक केली आहे. शिंदे हा एक खाजगी इंग्रजी शाळेच्या बसचा चालक असून त्याने दरोडेखोरांना संतोष लड्डांच्या घरातील संपत्तीची माहिती दिली होती. शिंदेला गुप्तधन, काळ्या जादूचा नांद असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदेला लड्डांच्या घरात पैशाची माहिती मिळाली होती, ही माहिती त्याने आरोपी हसबेला पुरविली. परंतू शिंदेला माहिती देणाऱ्या अजून एका आरोपीचे पोलीस शोध घेत आहे. यापूर्वी पोलिसांनी सोहेल जलील शेख, सय्यद अझरुद्दीन, योगेश सुभाष हसबे, महेंद्र माधवराव बिडवे सुरेश उर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे यांना अटक करून अमोल खोतकरला एनकाउंटर केले आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


