
वाळूज महानगर : बजाजनगरमध्ये
आरएल सेक्टरमध्ये प्लाट नंबर ९३ मध्ये उद्योजन संतोष लड्डा यांच्या घरात दरोडा टाकून तब्बल ८ किलो सोने व ४० किलो चांदी व रोख लंपास केल्याची घटना दि १५ रोजी सकाळी ४ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार संतोष लड्डा यांची वाळूज एमआयडीसीमध्ये दिशा ऑटो कॉम्प्स नावाने के २३७ मध्ये कंपनी आहे. ते ८ मी रोजी कुटुंबासह विदेशात गेले आहे. दरम्यान लड्डा यांचे चालक संजय झळके हे घराची देखभाल करत असून ते रात्री बंगल्यात एकटेच झोपलेले असतांना दि १५ मे रोजी रात्री २ वाजेच्या दरोडेखोरांनी त्यांचे डोक्यातला पिस्तुल रोखून हाथ बांधून तोंडाला चिगटपट्टी लाऊन चोरट्यांनी तब्बल ८ किलो सोने व ४० किलो चांदीचे दागिने लंपास केल्याची प्रार्थमिक माहिती आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून घटनेची छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांचासह सहायक पोलीस उपायुक्त संजय सानप, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे रामेश्वर गाडे, छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे, यांचासह ठशे तज्ञ, श्वान पथक, यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे