July 7, 2025
d6c0b44e-6dbf-49ca-9808-c41a053b6013

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बजाजनगर येथील ऑर्किड टेक्नो स्कूलचे विद्यार्थी 10वी CBSE बोर्ड परीक्षा -2024-2025 मध्ये 100% निकालासह आघाडीवर आहेत. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत 121 विद्यार्थी बसले होते. 90 ते 80% गुण मिळवलेले 14 विद्यार्थी त्यात चिकने धनश्री मनोहर ही 94.40% गुण मिळवून अव्वल क्रमांक मिळवला, तर घुगे शिवम नामदेवराव 93.40% व उरकुडे रक्षिता संजय 93.40% गुणांसह गुणांसह द्वितीय क्रमांकावर आहेत. वाघ व्यंकटेश सचिन 92.40% तिसरा क्रमांकावर राहिला तर माळी अनुसया गोविंद 92.20% गुण मिळवून चौथा क्रमांक मिळवला उगेमुगे सुमेध सुहास 91.60% पाचवा क्रमांक मिळवला तर पांडे अभी मृतुन्जय 91.20%, डुकरे आदित्या दीपक 90.80% गोराडे धनंजय रुखमंदास 90.60%, चव्हाण प्रज्वल महादेव 90.60% राजपूत अनुष्का रामधन 90.20% चिकने तेजश्री महोहर 90.20%, जाधव आदित्य दीपक 90.20% इंगोले अमान श्रीक्रीष्णा 89.60% गुण मिळवले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी अभिनंदन करत, पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!