July 8, 2025
Screenshot

Screenshot


Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज औद्योगिक क्षेत्रातील मासिआ या सभागृहक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संवाद उद्योजकांशी हा कार्यक्रम दि ४ रोजी पार पडला यामध्ये उद्योजकांच्या विविध समस्या ऐकून घेऊन उद्योजकांना त्रास देणाऱ्या खंडीखोरांना मकोका लावण्याचे निर्देश अजित पवार यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना दिले.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर (मासिआ) येथे सूक्ष्म व लघु उद्योजकांचे प्रश्न समस्या चर्चेसाठी ‘संवाद उद्योजकांशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते.

या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती त्याचबरोबर आमदार सतीश चव्हाण विक्रम काळे पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त नितीन बगाटे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे अभिजीत भैय्या देशमुख मसिया चे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर अजित पवार यांनी जानेवारी मध्ये होणाऱ्या मसिआ Advantage महाराष्ट्र एक्सपो या औद्योगिक प्रदर्शनासाठी शासनाकडून आर्थिक मदत केली जाईल, जीएसटी चे ट्रिब्यूनल ऑफिस हे छत्रपती संभाजी नगरला व्हावे यासाठी प्रयत्न करेल, शेंद्रा वाळुज आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्राला रिंग रोड करण्यासाठी प्रयत्न करेल रांजणगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करणे, औद्योगिक क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा विविध समस्यांवर आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गायके तर आभार दिलीप चौधरी यांनी मानले तसेच कार्यक्रमाला म्हशीचे माजी अध्यक्ष भारत मोथिंगे बालाजी शिंदे सुनील किर्दक किरण जगताप अनिल पाटील चेतन राऊत विद्यमान अध्यक्ष अर्जुन गायकवाड उपाध्यक्ष राहुल मोगले सचिव सचिन गायके दीपक चौधरी सहसचिव रमाकांत कुरकुंडवार वीरेन पाटील कोषाध्यक्ष सर्जेराव साळुंखे राजेश विधाते प्रसिद्ध प्रमुख राजेंद्र चौधरी उद्योग संवाद चे उपसंपादक शरद चोपडे यांच्यासह सर्व सदस्य दुष्यंत आठवले संजय गांधी कुंदन रेड्डी नितीन तोष्णीवाल रवी आहेर मिलिंद कुलकर्णी सुदीप भारतीय आनंद पाटील प्रल्हाद गायकवाड श्रीधर वेलंगी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!