July 7, 2025
4e99f6a9-a81b-4209-970b-61cdb96bf95c

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज महानगर एक मधील श्री विजय हरी रसीडेन्सी या उच्चभ्रू सोसायटीमध्ये चोरट्यांनी तब्बल २२ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची दि ३ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस अली. याप्रकरणी सचिन चव्हाण यांचा फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सचिन नारायण चव्हाण हे पत्नी दीपाश्री, एक मुलगी वडील नारायण आई विमल सर्व कुटुंब सिडको वाळूज महानगर एक मध्ये श्रीविजयहरी रेसिडेन्सी गट १७५ येथे राहतात, सचिन चव्हाण सचिन चव्हाण हे खाजगी खाजगी नोकरी करतात, सचिन चव्हाण यांचे आई वडील हे लग्नासाठी तीन दिवसापूर्वी गावी गेले होते. आज सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वरील फ्लॉवरच्या घराचा सेफ्टी दरवाजा उघडा असल्याचे सचिन यांचा लक्षात आले आत प्रवेश करून बघितले असता कपाटातील साहित्य अस्थाव्यस्थ असलेले त्यांना दिसले. दरम्यान कपाटामध्ये असलेले सोन्याचे राणी हार, नेकलेस, बांगड्या, कानातील वेल, अंगठ्या, सोन्याचे कॉइन इतर सोन्याचे दागिने असा एकूण २२ तोळ्याचे दागिने, २० हजार रोख, चांदीचे जोडवे,नेकलेस चोरून नेल्याचे फिरीदीचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमडीआयडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ठसे तज्ञ, श्वान पथक पाचारण करून घटना समजून घेतली. याप्रकरणी सचिन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!