
न्यूज़ मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बजाजनगर येथील ऑर्किड जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश प्रात केले आहे. यशाचे शिखर गाठत सायन्स आणि कॉमर्स या दोन्ही शाखेचा १००% निकाल लागला. यात, गुरव चैतन्य याने ९५.८३% गुण प्राप्त करून पहिला क्रमांक मिळवला. त्यात त्याने संस्कृत व अकाउंट या विषयात १०० गुण मिळवले. धोत्रे रितेश याने ९३.१७% गुण प्राप्त करून दूसरा क्रमांक मिळवला, त्यात त्याने अकाउंट या विषयात १०० गुण मिळवले. निकम अजित याने ८९.६७% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळवला. यात त्याने अकाउंट या विषयात १०० गुण मिळवले. तसेच, दाभाडे लावण्या हिने ८७.१७%, पांडे मेहेक ८६.३३%, राठोड ओम ८६.१७%, बसवदे साईराज ८५.६७%, सिन्हा मोहितकुमार ८५.१७%, गायकवाड सागर ८४.८३%, विजयवर्गीय तनया ८४.०५%, खवले आदित्य ८३.६७% गुण प्राप्त केले. ऑर्किड ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आणि पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले व भावी वाटचाली साठी शुभेछा दिल्या.
****
-
तलवार–सुरा घेऊन दहशत माजवणारा परवेज पोलिसांच्या जाळ्यात
Share Total Views: 38 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/वाळूज महानगर जोगेश्वरी परिसरात हातात तलवार आणि सुरा घेऊन
-
लाडक्या बहिणींना दिलासा! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ
Share Total Views: 40 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे) न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे) छत्रपती
-
“पीएमओ सचिव” बनून फसवणूक करणारा बीडचा तरुण अटकेत!
Share Total Views: 15 वाळूज MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई – साथीदारासह बेड्या न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/वाळूज



