July 7, 2025
Screenshot

Screenshot


Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : तिसगावमध्ये दि १५ रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान दोन गटात झालेल्या राड्यातील एका गटावर गुन्हा दाखल करण्यात आला होता,आता दुसऱ्या गटावरही आकाश तरैय्यावाले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादीमध्ये असे लिहले आहे की, तिसगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणुक काढण्यात आली होती. मिरवणुक ही राजेद्र कसुरे यांचे घरापासुन काही अंतरावर पुढे गेली. असता आकाश, चुलत भाऊ बिरजु तरैय्यावाले, पुतण्या ऋतिक तरैय्यानाले असे ग्रामपंचायत जवळ उभे होत, तेथे गावात राहणारे योगेश रामचंद्र कसुरे, राहुल कसुरे, सागर कसुरे, राजेंद्र कसुरे असे ही उभे होते, पैकी योगेश कसुरे याने आकाशचा चुलत भाऊ बिरजु तरैय्यावाले याला जुन्या भांडणाच्या कारणावरुन खुन्नस देवुन हाताने ईशारे करुन ईकडे ये तुला बघतो असे म्हणुन मोठ्या आवाजात हाक मारली असता बिरजु हा त्यांचे कडे गेला व त्यांना समजावुन सांगु लागला असता त्याचे काहीएक न ऐकता योगेश कसुरे याने बिरजु तरैय्यावाले याला हाता चापटांनी मारहाण करुन त्याचा गळा दाबला, व तोंडावुर बुक्का मारला त्यावरुन त्याचे सोबत असणारे राहुल कसुरे, सागर कसुरे, राजेंद्र कसुरे यांनी सुद्धा बिरजुला, आकाशला व ऋतिक ला मारहाण केली व शीव जैस्वालच्या घरासमोर असताना योगेश कसुरे, राजेश कसुरे, राजेंद्र कसुरे, राहुल कसुरे, रवि कसुरे, नरेद्र कसुरे, लालचंद कसुरे, लखन सुर्यवंशी, सागर कसुरे व ईतर चार ते पाच असे हातात, तलवार, लोखंडी रॉड, चाकु, व लाकडी दांडे घेवुन आले त्यावरुन आकाश व बिरजु, व ओमकार सलामपुरे, व ईतर नातेवाईक ज्यात ऋतिक तरैय्यावाले, अमृतसिंग सलामपुरे, ईश्वर सिंग तरैय्यावाले, अभय तरैय्यावाले असे वाचविण्यासाठी तेथे आले असता गावातील हनुमान मंदीर रोडवर ग्रामपंचायत जवळ योगेश रामचंद्र कसुरे व त्याचे साथीदार यांनी रोडवरच पाहुन त्यांचे पैकी योगेश कसुरे हा म्हणाला की, तुम्हाला जास्त माज आला काय? आज तुमची मस्तीच जिरवतो, ये बिरज्या, ये ऋत्या आज तर तुमचा दोघांचा गेम खल्लास करतो असे म्हणून बिरजुला व ऋतिकला जीवे मारण्याच्या उद्देशाने योगेश कसुरे याने त्याच्या हातातील तलवारीने ऋतिक वर डोक्यात वार केला असता तो वार ऋतिक च्या डोक्यात लागुन ऋतिक गंभीर जखमी झाला, नंतर राजेश कसुरे याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने ऋतिक च्या हातावर जोरदार फटका मारला त्यात ऋतिक खाली पडला काही लोक त्यांना समजावुन सांगत असतांना ते कोणीही समजुन घेण्याच्या मनस्थीतीत नव्हते नरेंद्र व राजेंद्र यांनी लाथाबुक्यांनी सुद्धा मारहाण केली. व ईतरांनी सोबत भांडण सोडविम्यासाठी आलेलें ईतर सर्वांना लाकडी दांड्याने, हाताचापटानी मारहाण केली भांडणात ऋतिक गंभीर जखमी झाल्याने त्याला घेवुन दवाखान्यात आणले व त्याचेवर सध्या उपचार सुरु असुन त्याची प्रकृती गंभीर आहे. त्यावरुन पोलीस त्याचा जबाब घेण्यासाठी आले असता तो जबाब देण्याच्या स्थीतीत नसल्याने व मला सुद्धा मारहाण केली असल्याने आकाशने पोलीसात येवुन वरील ईस मांविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली आहे. याप्रकरणी योगेश कसुरे, राहुल कसुरे, सागर कसुरे, राजेंद्र कसुरे, रवि कसुरे, नरेंद्र कसुरे, लालचंद कसुरे, लखन सुर्यवंशी,राजे श कसुरे व ईतर 04 ते 05 यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!