April 24, 2025
6c965781-92c9-44f8-98bb-566cb322387c

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : (दि २३) – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप हिंदू बांधवाना श्रद्धांजली देण्यात आली तसेच पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, मा. जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, शहर प्रमुख विशाल खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आंदोलनाची सुरुवात झाली.

घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता येणारा जाणार प्रत्येक नागरिक उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभाग नोंदवत होता शेवटी सर्वांच्या वतीने मौन बाळगत शांतता राखुन मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली व आंदोलनाची सांगता झाली .. यावेळी तिसगाव माजी उपसरपंच तथा उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, श्रीकृष्ण राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य महेंद्र खोतकर, पाटोदा उपसरपंच कपिंद्र पेरे, दलित आघाडी तालुका अध्यक्ष अनिल जाधव, महिला आघाडी जेष्ठ कार्यकर्त्या मीराताई पाटील,शहरप्रमुख संगीता बनकर, उपतालुकाप्रमुख मीरा चव्हाण, अनिता लेंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य काकाजी जीवरग, बजरंग पाटील, उपशहर प्रमुख नामदेव सागडे, विभाग प्रमुख प्रवीण चंदन, शिवशंकर सगट, रतन नलावडे, त्रिंबक जगताप, विनोद दाभाडे, सतीश हिवाळे, रोहिदास चव्हाण, व्यापारी आघाडी जिल्हा प्रमुख सतीश अग्रवाल, युवासेना तालुका अधिकारी विजय वाडेकर, अमोल होर्शील, संतोष चंदन, शाखाप्रमुख नरसिंग ढगे, पंढरीनाथ चोपडे, दादासाहेब गोराडे, उपविभागप्रमुख लहू खराटे, शंकर दांडगे, समाधान ठोंबरे, नितीन कलांत्रे, अशोक कटारे, देवीदास पवार, अशोक मकासरे, नंदू जगताप, वैजिनाथ तुपे, अशोक मकासरे, रिक्षा आघाडीचे बद्रीनाथ दाभाडे, साहेबराव रणयेवले, तसेच शिवसैनिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी पोलीस प्रशासनाने देखील मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता पोलिस प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलिस कर्मचारी बाबासाहेब आंधळे, योगेश शेळके, विक्रम वाघ, अरुण उगले आदींची उपस्थिती होती

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!