April 18, 2025
b639a159-5fc4-4aac-8629-f17ed825a93b

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : तिसगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून रागाने बघितल्याने झालेल्या वादातून योगेश कासुरे वय ३३ याला तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि १५ रोजी रात्री ९ वाजेची सुमारास घडली. याप्रकरणी १० जणांवर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश कासुरे यांच्या चुलत भाऊ राजेश कासुरे यांच्या घरासमोरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक ३००-४०० मीटर पुढे गेल्यानंतर बिरजू तरैय्यावाले हा जुन्या वादाच्या कारणावरून योगेशकडे रागाने पाहत असतांना दोघांत वाद झाला. थोड्या वेळांनतर बिरजु तरैयावाले,आकाश मन्नुलाल तरैयावाले,ओमकार मोहनसिंग सलामपुरे,कुंदन मन्नुलाल तरयावाले, चंदुलाल मिड्डूलाल तरैयावाले,मन्नु लाल तरैयावाले, ऋतीक तारासिंग तरेयावाले. अमृतस्गि आसाराम तरैयावाले, अभय तारासिंग तरैयावाले, ईश्वरसिंग तरैयावाले व इतर पाच ते सहा जन यांनी यांनी हातात तलवार, चाकु, लोखंडी रॉड व लाठ्या काठ्या घेऊन योगेशला कसूरेला मारण्यासाठी आले. तेव्हा आकाश मन्नलाल तरैयावाले याने त्याचे हातातील तलवारीने योगेशला जिवे मारण्याचे उद्देशाने छातीवर व पार्श्व भागावर वार केल त्यानंतर बिरजु मिठ्ठलाल तरैयावाले याने सुद्धा मला जिवे मारण्याचे उद्देशाने त्याचे हातातील लोंखडी रॉडने माझ्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. त्यानंतर योगेशला वाचवण्यासाठी चुलत भाऊ राजेंद्र कसुरेव नरेंद्र शामलाल कसुरे हे आले असता त्यांना सुध्दा वरील तलवाराने व लोंखडी रॉडने जिवे मारण्याचे उद्देवाने मारुन जखमी केले त्यानंतर बाजुला असलेले राहुल कसुरे, सागर कसुरे, कमलेश सलामपुरे, ऋषीकेश सलामपुरे, गोपाल सलामपुरे, सोमनाथ क्षत्रिय या सर्वांनी मिळून भांडण सोडवले त्यानंतर योगेशला राजेंद्र व नरेंद्रला सागर कसुरे व वि कसुरे यांनी खाजगी दवाखान्यात दाखल केले व सध्या योगेश कसूरेवर उपचार सुरू असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे हे करीत आहे.

घटनास्थळला उपायुक्त नितीन बगाटे यांची भेट

घटनेचेने गांभीर्य बघता छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी तिसगाव येथे येऊन नागरिकांची समजूत घालून शांत रहाणेचे आवाहन केले, यावेळी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्यासह अधिकारी व अंमलदार यांची उपस्थिती होती.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!