July 7, 2025
36001dbc-7a0c-4690-a117-791294f11280

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : तिसगाव येथून पाडेगाव रस्त्यावर तिसगाव चौफुली जवळ भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीला जोरात दिल्याने अपघात झाला असून त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दि १५ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास घडला. परमेश्वर बाळू शिंदे वय ४० रा खवडा तिसगाव असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी क्र एमएच २० जीपी ७४३६ ह्या दुचाकीवरून परमेश्वर शिंदे हा खवडा वस्ती कडून तिसगाव चौफुली कडे येत असताना रस्त्यावर येताच समोरून आलेली फॉर्च्युनर कार क्र एम एच २० सी जी ७७७० ह्या कारची दुचाकीला जोरात धडक बसल्याने मोठा अपघात घडला त्यात परमेश्वर शिंदे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, हा अपघात एवढा भगानक होता की कार थेट रोड ओलांडून थेट खड्यात कोसळली तर दुचाकीचा चुराडा झाला, ह्या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाळूज एमआयडीसी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चोभे, मंगेश जाधव यांनी धाव घेत कार क्रेमच्या सहायाने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतांना नातेवाईकांनी घटस्थळी येऊन अपघातातील कुठेही कार न हलवण्यासाठी गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार योगेश शेळके याच्यासह तिसगावचे माजी सरपंच अंजन साळवे यांनी नातेवाईकची समजूत घातली. अपघातातील दोन्हीही गाड्या पोलीस ठाण्यात नेण्यात आल्या असून पुढील तपासपोलीस करत आहे.

***


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!