April 19, 2025
6f6f401e-a609-487f-8944-77105f689471

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर (प्रतिनिधी ) : संपूर्ण देशभरात ८ एप्रिल ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत साजरा होणाऱ्या पोषण पखवड्याचे वाळुज येथे भव्य उद्घाटन करण्यात आले. वाळुज येथील गरवारे कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त मा. कैलास पगारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण स्थानिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याद्वारे भरविण्यात आलेले पाककृती प्रदर्शन होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपस्थितांना संतुलित आणि पोषणयुक्त आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांमध्ये पोषणाबद्दल जागरूकता वाढल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
या प्रसंगी आयुक्त कैलास पगारे यांच्या हस्ते सुदृढ बालकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात पोषण आहाराचे महत्त्व अधोरेखित करत पोषण जनआंदोलन का आवश्यक आहे, यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सर्वांना या मोहिमेत सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमास एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी कल्पना देशमुख, गोविंद अंधारे, रिता शिंदे, वंदना कव्वाल तसेच गरवारेचे श्री. सुतवणे यांच्यासह अनेक सेविका, मदतनीस आणि स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिता शिंदे यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!