July 7, 2025
7973b264-f16e-4bdc-9558-84bf63a20d63

न्युज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : बजाजनगरमध्ये नाना नाणी पार्क जवळ एका अनोळखी तरुण झोपलेला असताना डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने मृत्यू झाल्याची घटना दि ११ एप्रिल रोजी सकाळी उघकीस अली होती, यासंदर्भात ट्रक क्र एम एच २० ए टी ८८४६ चालक योगेश शिवचंद्र शिंदे याचावर रा सिमेन्स कॉलनी बजाजनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी हे करत होते. तो अनोळखी मयत तरुण हा अमोल वसंत थोरात वय ३० रा मोताळा जि बुलढाणा येथील असून वाळूज महानगर १ मध्ये तो भाऊ अतुल थोरात सोबत स्वतःच्या घरात राहत होता. मयत अमोल हा खाजगी कंपनीमध्ये जॉब करत होता. मिळालेल्या माहितीनुसार एक महिन्यापूर्वी पती-पत्नीचा घटस्फोट झाला होता त्यामुळे तो मानसिक तणावात असल्याचे नातेवाईकाने सांगितले आहे. वाळूज महानगर येथे राहत असताना तो दोन दिवसापासून घरी आला नसल्याचे भाऊ अतुलने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शोधपत्रिका प्रसिद्ध केल्यानंतर नातेवाईकानी पोलिसांना संपर्क करून तो मृतदेह अमोल वसंत थोरातचा असल्याचे पोलिसांना सांगितले.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!