April 19, 2025
1c05ee50-1c9b-4e8f-af09-60b17259d82a

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : बजाजनगर येथील विविध चौकातील अतिक्रमण एमआयडीसी ने काढले आहे. यावेळी अतिक्रमण धारकांची धावपळ उडाली.

बजाजनगरमध्ये मोहतादेवी चौक, मोरे चौक, प्रताप चौक, जयभवानी चौक व इतर बऱ्याच चौकात भाजीविक्रेत्यांसह इतर किरकोळ साहित्य विक्रेते अतिक्रमण करून बसतात, त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन नागरिकांना परिणाम भोगावा लागतो, वेळोवेळी हे अतिक्रमण एमआयडीसी व पोलीस प्रशासनाकडून काढले जाते, परंतु पुन्हा काही दिवसांनंतर अतिक्रमण केले जाते, त्यामुळे कायमस्वरूपी अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी उप अभियंता मुळीकर साहेब, सहाय्यक अभियंता अजय चन्ने साहेब, तांत्रिक सहाय्यक दत्ता शिंदे, प्रशांत सरोदे, सुदर्शन बोर्डे सुरक्षा रक्षक, भरत साळे, गौतम मोरे, मिलिंद खिल्लारे, अविनाश मोरे, नंदू मगर, सुरेश साळे, मच्छिंद्र जाधव, दीपक जाधव, संजय चौथ, किसन देहाडे, राजकुमार साळवे, तुकाराम जाधव हे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!