April 19, 2025
IMG_5863

न्युज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : बजाजनगर येथील नाना-नाणी पार्क येथे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे ५:३० वाजता घडली.

ही व्यक्ती अनोळखी असून पोलीस ओळख पटवण्याचे काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बजाजनगर येथे नाना-नाणी पार्क येथे नागरिक मॉर्निंग वॉक साठी येतात, पार्कच्या बाजूला रस्ता आहे, त्यावर नेहमी ट्रक पार्किंग केलेले असतात, एका ट्रकजवळ हा व्यक्ती झोपलेला होता, सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ट्रकचालक ट्रकची कैबिन साफ करून ट्रक सुरू करून निघाला, परंतु अंधार असल्याने त्याला ट्रकजवळ झोपलेला व्यक्ती दिसला नाही आणि झोपलेल्या व्यक्तीच्या ट्रक सुरू झाल्याचे लक्षात आले नाही, ट्रक थोडा पुढे गेला व नागरिकांच्या ही घटनालक्षात आली व ट्रकचालकाला नागरिकांनी थांबवून पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह घाटी दवाखान्यात पाठवलेला असून मयत झालेला व्यक्ती कोण आणि का झोपलेला होता याचा तपास पोलीस करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!