April 17, 2025
IMG_5781

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगर मधील पंढरपूर तिरंगा चौकामध्ये दि ५ एप्रिल रोजी सकाळी जखमी अवस्थेत ३१ वर्षीय विशाल रावसाहेब म्हस्के या तरुणाचा मृतदेह आढळला होता, याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, खून की अपघात याचा तपास सुरू असतांना पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून तपास सुरू असतांना विशाल म्हस्के हे दि ५ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास विशाल म्हस्के हे उभे असतांना एका भरधाव ट्रॅव्हल बसने जोरात धडक अपघात झाल्याचे नागरिकांकडून पोलिसांना कळाले आहे. त्या अपघातात विशालच्या जाभाड्याला, डोक्याला व पायावरून बस गेल्यामुळे पाय मोडला गेला होता, डोक्यातून जास्त रक्त स्त्राव झाला अपघातामुळे हा मृत्यू झाल्याचे लक्षात आले आहे. हा खून नसून हा अपघात झाल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले असून पोलीस त्या ट्रव्हल्स बसचा शोध घेत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!