April 17, 2025
1dbbadff-0631-4fb5-b4b7-4be727c82fd4

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगर – नगर महामार्गावरील पंढरपूर येथे जखमी अवस्थेत एका ३१ वर्षीय तरुणाचा रोडच्या कडेला मृतदेह आढळला असून तो अपघात आहे की खून याचा पोलीस शोध घेत आहे. ही घटना आज दि ४ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ६.१५ वाजता तिरंगा चौक येथे पोलिसांना एक अनोळखी व्यक्तीचा जखमी अवस्थेत मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक अरविंद शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मानेवर मोठी जखम, पाय मोडलेला, पँट अर्धवट घातलेली, इतर शरीरावर जखमा असलेला मृतदेह रुग्णवाहिकेच्या सहायाने घाटी दवाखान्यात पाठवला. दरम्यान मयत व्यक्तीजवळ एका पॉकेट आढळले असून त्यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड निघाले आहे, त्यावर विशाल रावसाहेब म्हस्के वय ३१ रा बिठ्ठलवाडी ता जि पुणे असे असून पोलिसांनी इतर माहितीच्या आधारे मयत व्यक्तीचे मेव्हणे अविनाश सरकटे रा भीमा कोतेगाव यांना संपर्क करून याबद्दल माहिती दिली. यासंदर्भात वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून विशाल म्हस्के यांचा मृत्यू कशामुळे झाला हा खून की अपघात याचा शोध पोलीस घेत आहे.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!