April 17, 2025
724a909a-807b-4446-a14d-2bbe18752ec0

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील लिंबेजळगाव येथे असलेल्या महा-ई सेवा केंद्रचालकाला दुकान बंद करून घरी जात असताना सोबत असलेले मणी ट्रान्सफरची २ लाख ४० हजाराची रोकड टेंभापुरी रस्त्यावर येताच चोरट्यांनी दुचाकी अडवून लुटल्याची घटना दि ४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली आहे.


याबाबत वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप अण्णा ढोले (वय ४०), व्यवसाय – महा ई-सेवा केंद्र, रा. वाळूज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी चालवत घरी जात असताना, स्कुटीवरून आलेल्या अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. डोळ्यात मिरची टाकून त्यांना दांडेने मारहाण करत, जीवे मारण्याची धमकी देत मोटरसायकलच्या डिक्कीतून रोख रक्कम व फोल्डरमधील कागदपत्रे चोरून नेण्यात आली.
गुन्ह्याचा तपास पोउपनिरीक्षक अजय शितोळे करीत आहे.

*****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!