July 7, 2025
f341ecff-78ab-4315-a2ea-9ce1067e0799

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे मानवी जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे असणारे हात पाय गमावल्यामुळे निराश झालेल्या दिव्यांगाना कृत्रिम अवयव (हात पाय )वितरीत करण्यात आल्याने त्यांच्या दुःखी जीवनात आनंदाचा अंकुर फुलला. बजाजनगरातील धार्मिक, अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांचे प्रमुख केंद्र असलेल्या श्री जागृत हनुमान मंदिराच्या सभागृहात गुरुवारी ता.3 रोजी हा कार्यक्रम पार पडला. सक्षम देवगिरी प्रांत संभाजीनगर,समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, एस.आर. ट्रस्ट मध्यप्रदेश व अल्मिको (ALMICO) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी हा कार्यक्रम पार पडला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक तालुका स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


या कार्यक्रमा प्रसंगी अल्मिको व एस. आर. ट्रस्ट चे कृत्रिम अवयव तज्ञ डॉ. रुक्मिणी सोनेवाड, डॉ .रुपेश जाधव, (मुंबई), वडगाव बजाजनगर चे सरपंच सुनील काळे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक भानुदास पळसकर,डॉ. एम डी संकपाळ, पारसचंद साकला,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा विभागाचे अनिल पाटील, सेवा भारतीचे संजय कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जागृत हनुमान मंदिरा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमात बजाजनगर येथे दुपारी 3 वाजे पर्यंत 88 दिव्यांगाना कृत्रिम अववय (हात पाय) वितरण करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!