July 8, 2025
IMG_5706

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : पतीला सोडून प्रियकरासोबत निघून आलेल्या महिलेवर प्रियकरसह त्याच्या तीन भावाने प्रियकराच्या संमतीने वारंवार ४ वर्षे बलात्कार केल्याची घटना आज दि ३ रोजी उघडकीस अली आहे. याप्रकरणी प्रियकरासह तिघांवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला ती आठवीमध्ये शिकत असताना तिला एका मुलासोबत प्रेम झाले, परंतु ही बाब तिच्या आईवडिलाना लक्षात आल्याने तिचे सन २०१० मध्ये लग्न दुसऱ्या मुलासोबत लाऊन देण्यात आले. लग्नानंतर दोन वर्षानंतर पीडित महिला ही प्रियकराकडे निघून आली त्यानंतर ते बजाजनगर येथे पीडित महिला ही प्रियकरासह त्याचे आई,भाऊ,वहिनी हे एकत्र राहू लागले. २०२० मध्ये रांजणगाव येथे राहायला गेले, लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रमाला प्रियकराचा दुसराभाऊ कार्यक्रमाला आला होता, सगळे झोपल्यानंतर त्यानेही बळजबरीने शारीरिक संबंध केले हे सगळं प्रियकराला माहीत होत. सण २०२२ मध्ये प्रियकराचा चुलत भाऊ मुक्कामी घरी आला असता प्रियकर घरी असताना त्यानेही शिवीगाळ करून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. एप्रिल २०२४ रोजी प्रियकराच्या मोठ्या भावाने पीडित महिलेच्या १३ वर्षीय मुलीला वाईट उद्देशाने अश्लील चाळे केले, मला शासिरिक संबंध करू से अन्यथा तुझ्या मुलीचे जीवन बरबाद करेल असी धमकी देत त्याने जबरदस्तीने शारीरिक सबंध केले, व त्याचा त्याने वीडियो केल्याचे महिलेने सांगितले. आई वडिलाकडून निघून आल्याने महिला त्यांना हा प्रकार सांगू शकली नाही, महिलेने थेट वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून प्रियकरासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!