July 7, 2025
1d4e2184-9cd8-474f-986f-7e6fa0dc0ed0

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : बजाजनगर येथे पत्नीने वारंवार दारू पिणाऱ्या पतीला दारू पिण्यास विरोध केल्याने राग आलेल्या पतीने पत्नीला कैचीने मानेवर साफसफ वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, यात पत्नी गंभीर जखमी झाली असून खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. ही घटना आज दि २ रोजी दुपारी घडली. कोमल ऋषिकेश खैरे वय ३० असे जखमी पत्नीचे नाव असून ऋषिकेश खैरे असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश भिकाजी खैरे हा मूळ सोमनाथ जळगाव जि जालना याचे सन २०१७ मध्ये कोमल यांच्यासोबत लग्न झाले, त्यांना पाच वर्षाची मुलगी असून, ते बजाजनगर येथील गणपती मंदिर परिसरात भाड्याच्या रूममध्ये राहतात, त्यांचे गौरी किराणानावाने दुकान असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो, गेल्या काही दिवसापासून ऋषिकेश हा दारू पित असल्याने त्याचा दुकानावर होत होता, कोमलने दारू पिण्यास विरोध करायची, त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते, आज दि २ एप्रिल रोजी दुपारी कोमल व ऋषिकेश यांच्यात जोरात वाद झाले, त्या वादामध्ये राग आलेल्या ऋषिकेशने हातात आलेली कैचीने कोमल यांच्या मानेवर व गळ्यावर साफसफ वार करून कोमलला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, शेजारी राहत असलेल्या नागरिकांनी कोमलला जखमी अवस्थते खाजगी रुग्णालयात दाखल केले, यात कोमलच्या मानेवर डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून ६० ते ७० टाके पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आरोपी ऋषिकेश हा फरार असून पोलीस शोध घेत आहे. कोमल यांच्या भावाच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अरविंद शिंदे हे करत आहे.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!