July 7, 2025
Screenshot

Screenshot


न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : मुख्यमहामार्गावरील गोलवाडी फाटा ते थेट कायगाव हद्दीपर्यत होणार्‍या अपघाताच्या गंभीर घटना आणि राज्याचे अप्पर पोलिस महासंचालकांचे (वाहतुक) निर्देश, प्रादेशिक परिवहन मंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते, जागतिक बॅक प्रकल्प व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळपासून गोलवाडी ते पंढरपूर गावापर्यंत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली.
या मार्गावरील दुकानदार व रहिवाशांना वीस दिवसांपूर्वीच अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याबाबत नोटीसांद्वारे सूचना दिलेल्या होत्या. आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. अतिक्रमण हटाव पथक हे जेसीबी, हायवा व अधिकार्‍यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल होताच अतिक्रमण धारकांत धावपळ सुरू झाली. तरीही अधिकार्‍यांनी छोट्या दुकानदारांचे सामान काढून घेण्यास वेळ दिला. परंतु पक्के अतिक्रमण मात्र जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. ही मोहीम गोलवाडीफाटा ते जुने कायगावपर्यंत अतिक्रमण जमिनदोस्त होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.


छञपती संभाजीनगर ते पुणे रोडवरील गोलवाडीफाटा ते कायगाव पर्यत वाढत्या अपघाताच्या घटना. औद्योगिक वसाहतीने वाळूजपर्यत मोठ्या प्रमाणात वाहतूक. सायंकाळी वाहतुक कोंडी. अपघाताची मालिका. सामाजिक कार्यकर्ते नितीन राऊत यांचा एकाकी लढा आणि पाठपुरावा. त्यास राज्याचे अप्पर पोलिस महासंचालकांचे (वाहतुक) निर्देश, प्रादेशिक परिवहन मंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते, जागतिक बॅक प्रकल्प व पोलिस प्रशासन यांनी गांभीर्याने घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळ पाहणी. अतिक्रमण धारकांना नोटीसा आणि आज प्रत्यक्ष अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात.

Screenshot


दरम्यान, आज गुरुवार रोजी सकाळी ११.३० थेट गोलवाडी फाटा ते पंढरपूरपर्यंत कारवाई करत दुभाजकापासून साडेसात मिटरपर्यत रस्ता मोकळा करण्यात आला. मार्ग हा ६६ फुटाचा असून दोन्ही बाजुंनी तो ५० फुटापर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. या पथकात जागतिक बँक प्रकल्पचे कनिष्ठ अभियंता हरिष गर्जे, कांचन पडवळ, कनिष्ठ अभियंता अक्षय तांदळे, अभिजित चौधरी, राजू पाचपुते, गणेश राऊत, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल घोडके (वाहतूक), एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे जयकिशन चौथे, मंगेश मनोरे यांच्यासह चार होमगार्डचा आदींचा समावेश होता.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!