July 7, 2025
Screenshot

Screenshot


न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूजमहानगर – शेत वस्तीवरील घराचा दरवाजा तोडून, लाठ्याकाठावरसह चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत रोख रकमेसह महिलांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने मिळून जवळजवळ 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने घेऊन चोरट्यांनी पळ काढला. ही घटना वाळूज पोलीस ठाण्यांतर्गत अब्दलपूर शिवारातील शेत वस्तीवर मंगळवारी (दि.25) रोजी दीड वाजेच्या सुमारास घडली.


याबाबत वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी दिलेली माहिती अशी की, अब्दलपूर गावाच्या दक्षिणेस शिनगारे कुटुंब शेतात वस्ती करून राहतात. शेजारी शेजारी डबल रूमचे सिमेंट काँक्रीटचे घर व पाठीमागे एक पत्र्याची रूम असे पाच दरवाजा असलेले अंदाजे दीड हजार स्क्वेअर फुटाचे त्यांचे घर आहे. या शेतवस्तीवरील सुरेश रंगनाथ शिनगारे, इंदुबाई सुरेश शिनगारे, बाबासाहेब सुरेश शिनगारे, राणी बाबासाहेब शिनगारे व इंदुबाई शिनगारे यांचे वडील तसेच नातवंडे असे सर्व जण दोन वेगळ्या खोल्यांमध्ये झोपलेले होते. मंगळवारी रोजी भल्या पहाटे रात्री 1:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी पाठीमागील पत्र्याच्या घराचा दरवाजा फावड्याच्या सहाय्याने तोडला. यावेळी झालेल्या आवाजाने कुटुंब जागे झाले असता, चार जण हातात लाठ्या काठावर चाकू घेऊन आले. प्रथम त्यांनी सुरेश शिनगारे यांना चाकूचा धाक दाखवत लाठयाकाठ्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. यावेळी बाबासाहेब शिनगारे हा उठला असता त्याच्या अंगावर पांघरून टाकत बळजबरीने झोपून राहण्यास सांगितले. त्यानंतर इंदुबाई व राणी यांच्या अंगावरील सोन्याच्या पोत, टॉप्स, कुडकं, पाटल्या, लहान मुलाचा ओम असे सोन्या-चांदीचे दागिने व कपाटातील रोख 15 हजार रुपये असा एकूण अंदाजे 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला. विशेष म्हणजे शिनगारे कुटुंब कोणाला फोन करू नये म्हणून त्यांचे दोन मोबाईल घेऊन घराच्या परिसरात असलेल्या कांद्याच्या शेतात नेऊन टाकले.


घटनास्थळी पोलिसांची धाव –
या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाने, पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ, राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कारभारी देवरे, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, श्रीकांत सपकाळ, नितीन धुळे, सुधाकर पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय मुळे, पोलीस अंमलदार संतोष चौरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना तपास कामी सूचना केल्या.


आरोपींचा शोध सुरू –
दरम्यान स्वानपथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र तनपुरे, पंकज दळवी चालक आर बी हरकळ यांनी रॉकी या स्वानाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच ठसे तज्ञांनी ही घटनास्थळी भेट दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!