April 3, 2025
Screenshot

Screenshot


Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-

वाळुज महानगर – वाळूज महानगर येथे असलेल्या स्टरलाइट चौकात महापालिका आणि खाजगी स्कूल बस मध्ये अपघात झाला. यात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले, असून पुढील चौकशी पोलीस करीत आहेत. वाळुज महानगर मधील गजबजलेला परिसर ठीक ठिकाणी बघायला मिळतो. वाहनांवरील ताबे सुटल्याने आणि इतरस्त असलेल्या अतिक्रमणाने रोजच अपघात घडत आहे. आज रांजणगाव येथून शहराकडे निघालेल्या मनपा बस क्रमांक MH 20 el 0279 हिने समोरून येणाऱ्या खाजगी स्कूल बस एम एच 20 GC -0997 ला धडक दिली. यात गाडीच्या काचा फुटल्या आणि त्या विद्यार्थ्यांना जाऊन लागल्या. यात ते किरकोळ जखमी झाले. तत्काळ विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दिनेश दुधाट नामक तरुणाने दाखल केले.

Screenshot

पालक रुग्णालयात ….
अपघात घडल्याची माहिती मिळतात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. सुदैवाने यात कुठलीही मोठी हानी झाली नाही, हे कळाल्यानंतर पालकांनी मोकळा श्वास घेतला.
बसला जा ळ्य नाही…
नियमानुसार सातत्याने होणाऱ्या अपघात, दंगलीत होणारी दगडफेक आदी कारणांमुळे प्रत्येक स्कूल बस यांना जाळ्या लावण्यासाठी पोलीस आयुक्तालयातून निर्देश देण्यात आले होते. ही तशीच भूमिका संपूर्ण शहरात घेतली. मात्र, आज रोजी घडलेल्या अपघातात पोतदार इंग्लिश स्कूल या शाळेच्या बसला जाळच नव्हत्या. त्यामुळे अपघाताची तीव्रता थोडी जास्त वाढल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इतर खाजगी शाळेच्या बसला ही सुरक्षेच्या दृष्टीने जाळ्या बघायला मिळत नाही. यासाठी शाळा चालकांना तंबी देणे गरजेचे आहे.
तक्रार दाखल …
मनपा बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. शाळेचे संचालक यांनी या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!