
अभिवादन सोहळ्यासह विविध सामाजिक उपक्रम, मोटारसायकल रॅली, मिरवणुकीने वेधले लक्ष
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/ अनिकेत घोडके
वाळूज महानगर
वाळूज महानगर व परिसरात सार्वजनिक शिवजयंती व विविध शाळा, महाविद्यालय, संस्था संघटनांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवत बुधवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील बजाजनगर स्मारक, वडगाव कोल्हाटी, रांजणगाव शेणपुंजी, तिसगाव, पंढरपूर, वळदगाव, जोगेश्वरी, तुर्काबाद, अंबेलोहळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. परिसरात शिवजयंती निमित्त कीर्तन, प्रबोधन, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबीर, अन्नदान असे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. बुधवारी सकाळ पासून विविध भागातून रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहनांना भगवे ध्वज लावून रॅली काढून शिवरायांच्या नावाचा जयघोष करत येथील शिवस्मारक येथे येऊन अभिवादन करत होते.

विद्यार्थ्यांनी शिवरायांचा जयघोष करत विविध चौकांतून फेरी काढली. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, जिजाऊ आदी महापुरुषांच्या वेशभूषा केल्या होत्या. परिसरातील विविध शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत शिवजयंती साजरी केली. अनेक सोसायट्यामध्ये विविध स्पर्धा घेऊन घेण्यात आल्या.

बजाजनगर येथील शिवस्मारकारावर फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सकाळी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून आरती करण्यात आली. त्यानंतर दिवसभर नागरिक मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी येत होते.
मागच्या वर्षी बुलेट वर व या वर्षी कार वर देखावा सादर केला आनेक शिवप्रेमींनी फोटो घेत केलेल्या देखाव्यांची प्रशंसा केली. गाडी मालक रामेश्वर चौधरी गाडी सजवली भागवत चौधरी रा. सिडको वाळूज महानगर याची ही कार होती.
