
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( अनिकेत घोडके )-
वाळूज महानगर
वाळूज महानगरातील सारा इलाईट वसाहतीच्या जवळ असलेल्या मोकळ्या भूखंडावर काही नागरिकांकडून किंवा कचरा उचलणाऱ्यांकडून कचरा पेटवला जात असून यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. कचऱ्याच्या धुराचा त्रास वाहने चालविणाऱ्यांनाही होत असून कचरा पेटवून प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कचऱ्याच्या आगीमुळे निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

दोन दिवसांपूवीर् पाईपलाईन रोडवर सारा इलाईट वसाहतीच्या परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा पेटविण्यात आला होता. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास झाला. या आगीची झळ टू-व्हीलरवरून जाणाऱ्यांना पोहचत होती. कचऱ्याला कुणी आग लावली होती की ती लागली होती, हे कळले नाही. बराच वेळ ती आग तशीच होती. परीसरातील नागरिकांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना व एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पेटणाऱ्या कचऱ्यावर पाणी मारुन धूर आटोक्यात आणला. नागरिकांकडून होणारी ही कृती त्यांनाच त्रासदायक ठरते.
नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर याबाबत तक्रारी आल्या होत्या. तेथून येणारी दुर्गंधीही सर्वत्र पसरत असल्याने मग रेल्वे स्टेशनात जाणाऱ्या ट्रेनमधील हजारो प्रवाशांना त्याची दुर्गंधी येत असे.
चौकट:-
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळसुद्धा कचरा धुराच्या प्रदूषणप्रश्नी बघ्याची भूमिका घेत आहे. कचरा धूर केवळ चर्चेचा मुद्दा बनला असून, विषारी धुराचा नागरिकांना त्रास होत असूनही आरोग्यासंदर्भात प्रशासनाला देणेघेणे नसल्याचे दिसत असल्याचा आरोप नागरिकांना मधून होत आहे.
प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत…
सायंकाळच्या वेळेला परिसरात धुराचे प्रमाण स्पष्टपणे जाणवते. रस्त्याने चालत जाणारे नागरिक प्रशासनाचा निष्काळजीपणाची चर्चा करतात. नागरिकांना अक्षरशः नाकावर रुमाल घेऊन चालावे लागते. मास्क लावण्याशिवाय लहान मुले, वृद्धांना पर्यायच शिल्लक राहत नाही.–दत्तात्रय चोभे,(सारा इलाईट नागरिक).
सिडको वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत कचरा उघड्यावर टाकणे तसेच ते जाळण्या बाबत च्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून कचरा जाळल्यामुळे परिसरातील अरोग्य धोक्यात आले होते.या बाबत MPCB,CIDCO,तसेच जिल्हाधिकारी यांना दिले होते .परत परत आशा घटना घडत असतील तर आम्ही प्रशासना विरूद्धात लवकरच मोठे जन अंदोलन उभे करू. –नागेश कुठारे(अध्यक्ष, सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समिती)