July 7, 2025
07cd9b4a-9d7f-421f-9fe5-6815e23f40d4

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बाजाजनगर येथील बाजारपेठेत भगवे झेंडे, गमजा, ब्रेसलेट आदी साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग दिसून येत आहे. बजाजनगरातील शिवस्मारक समिती व पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्तांकडून जयंतीची जय्यत तयारी सुरू आहे.


मोहटादेवी परीसरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परीसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. येथील स्मारकावर सकाळी ९ वाजता एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या हस्ते अभिषेक होणार आहे. १० वाजता रक्तदान शिबीर व सायंकाळी ५ वाजता स्वामी जगताप हे शिवगाथा सादर करणार आहे. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे हस्ते महाआरती होणार असल्याचे शिवस्मारक समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
वाळूज महानगर परीसरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी भगवे झेंडे, पताका, गमजा, स्टिकर विक्रीचे हातगाडे, स्टॉल, दुकानांसमोर सजावट केली आहे. यावेळेस विद्युत माळांसह रुद्राक्षाच्या माळांची मागणी वाढली आहे. बजाजनगार परिसरात शिवजयंती १० दिवस आधीपासून विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. त्यामुळे जयंतीचे निमित्त साधून अनेक राजकीय पुढारी, कार्यकर्ते, संघटना पदाधिकार्‍यांचे डिजिटल पोस्टर शहराच्या विविध भागात लावले जातात. रमेश मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, मोहटादेवी मंदीर परीसर, रांजणगाव शें.पू., वडगाव को. साजापूर, बजाजनगर, भाजीमंडई परीसर, शिवस्मारक परीसर, पंढरपूर आदींसह चौका चौकात व प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जयंतीनिमीत्त शुभेच्छा संदेश देणारे डिजिटल लागले आहेत.


जयंतीला लागणारे सर्व साहित्य गत आठवड्यापासून आम्ही विक्रीस ठेवले आहे. दरवर्षी मी ना नफा ना तोटा या तत्वावर साहित्य विक्री करतो .यंदा दरात कोणतीही वाढ झालेली नाही असे बजाज नगरातील राजमुद्रा झेंडा स्टॉलचे मालक शुभम सुनील जोगदंड पाटील यांनी सांगितले

बजाजनगर या परीसरात अतिशय शिस्तबद्ध मिरवणुका, ध्वजारोहणासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला सजावट, लाइट शो, शोभायात्रा, शिवजन्मोत्सव पाळणा, भव्य मिरवणूक बजाजनगर वासियांना खूप आनंददायी असतो.
लक्ष्मण लांडे पाटील नागरिक
यावेळेस १५ फूट लांबीपर्यंतचे भगवे ध्वज, बाळ्या, ब्रेसलेट, भगवे, शिवरायांचा फोटो असलेला गमजा, अंगठ्या, रुद्राक्ष व भगव्या माळा, मोत्यांच्या माळा, राजमुद्रा प्लेट, ढाल तलवार, चंद्रकोर, शिवगंध, अष्टगंध, शिवरायांच्या मूर्ती, फोटो, प्रâेमही विक्रीस आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!