July 7, 2025
Screenshot

Screenshot



न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-

छत्रपती संभाजीनगर – आहिल्यानगर रोडवरील गरवारे कारखान्या समोर असलेल्या बकवालनगर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून रोख रक्कम ठेवण्याचे ट्रेच काढून नेले. या एटीएममध्ये १४ लाखांच्या आसपास १४ लाखांच्या आसपास रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी हिताची पेमेंट सर्व्हीसेसचे चॅनल एक्झिकिटिव्ह अविनाश म्हस्के यांच्या फिर्यादी वरून वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बकवाल नगरातील ?क्सीस बँकेच्या एटिएम वर रात्री १.४४ वाजेच्या सुमारास एटीएमवर संशयास्पद हालचाली सुरू असल्याची बँकेला माहिती कळाली. त्यावरून संबंधित बँकेने स्थानिक पोलिसांना माहिती दिली त्यावरून पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यावेळी एटीएममध्ये आग लागली होती, यावेळी पोलिसांनी एटीएममधील आग विझवली. एटीएममधील व परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, एटीएममध्ये २० ते २२ वर्षे वयोगटातील ३ ते ४ तरुण तोंडाला रुमाल बांधून सीसीटीव्हीवर काळा स्प्रे मारत असताना वैâद झाले तर महिंद्रा लिंबेजळगाव टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये पांढर्‍या रंगाची विना क्रमांकाची महिंद्रा एक्सयुव्ही ३०० ही संशयित कार पुण्याच्या दिशेने जाताना आढळून आली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे,पोलिस हवालदार संजय मुळे, प्रकाश चव्हाण, वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेत ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
एटीएम गजबजलेल्या ठिकाणी पण कुणाला पत्ता नाही
अ‍ॅक्सीस बॅकेचे हे एटीएम बकवालनगरच्या मुख्य रस्त्यावर आहे, तसेच एटीएमच्या वर नागरिक वास्तव्याला आहेत तरीही एटीएमचा बजर वाजला नाही, किंवा नागरिकांना कोणताच आवाज आला नाही, त्यामुळे एटीएमची सुरक्षेविषयी शंका उपस्थित होत आहे.
बँकांचा इन्शुरन्सवर भर
वाळूज व एमआयडीसी परिसरातील बहुतांश बँकांच्या एटीएमवर सुरक्षा रक्षक नाही, बजर नाही, किंवा इतर सुरक्षा नाही, केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून व इन्शुरन्स काढून बँका मोकळ्या होत असून, चोरीनंतर क्लेम करून बँका सुरक्षित होत आहे, परंतु अशा घटनांमुळे पोलिसांवर अतिरीक्त ताण पडत असल्याची खंत पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी बोलून दाखवली.
एटीएमचा अलार्म बंद
याविषयी ज्यांच्यावर एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्या कंपनीने सांगितले की, एटीएमच्या बाजूलाच हॉस्पिटल असल्याने आम्ही अलार्म बंद करून ठेवला आहे. जर अलार्म सुरू असता, तर परिसरातील नागरिकांना याची माहिती मिळून पुढील चोरीचा प्रयत्न फसला असता, अशाच प्रकारे बहुतांश एटीएमची सुरक्षा असल्याचे दिसून येत आहे.
धुळे येथेही याच पद्धतीने एटीएम फोडले
धुळे येथेही याच पद्धतीने गॅस कटरचा वापर करून एटीएम फोडल्याची घटना उघडकीस आलेली आहे, धुळे येथील प्रकरणातील गुन्हेगारांनी बकवालनगरातील एटीएम फोडले असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

*****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!