July 7, 2025
Screenshot

Screenshot


न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : वडगाव को येथील श्रीरामनगरात राहणारा नारायण विनायक तुपे वय ३२ मूळ गाव ( नरला ता फुलंब्री जि छत्रपती संभाजीनगर) हा मजुरी करुन वडिलांसह राहत होता. त्याला दारू पिण्याची सवय असल्याने काल दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दारू पिऊन घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याचे व वडिलांचे कडाक्याचे भांडण झाले. वडिल विनायक तुपे व त्याच्यात मारामारी झाली. यावेळी नारायण याच्या डोक्याला मार लागला होता. त्याच आवस्थेत तो झोपी गेला. सकाळी ५ वाजेच्या सुमारास वडील विनायक तुपे त्याला उठवाला गेले, तेव्हा तो उठला नाही, तो बेशुद्ध असल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ त्याच्या वडिलांनी नातेवाईकांसह उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी डॉक्टरांनी पोलिसांनी कळविल्यानंतर आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!