
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर, (प्रतिनिधी)- बजाजनगरातील गोरख वाघ चौकात काही युवक अल्पवयीन मुलीची छेड काढत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्या मुलीची युवकाच्या ताब्यातून सोडवून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याच्याच दुकानात कोंडून ठेवले. पोलिसांनी वेळेचे गांभिर्य ओळखून मोठ्या शिताफीने दोन युवकास ताब्यात घेतले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गोरख वाघ चौकातील एक युवक काही दिवसांपासून परिसरातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढत असल्याचा प्रकार सुरू होता. त्या युवकाच्या धाकाने सदर मुलीला बाहेर निघणे कठीण झाले होते. काल दिनांक १३ फेब्रुुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या ही अल्पवयीन मुलगी काही कामानिमित्त बाहेर आली असता, सदरील युवकाने त्या मुलीची छेड काढण्यास सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी मध्यस्थी करत त्या मुलीची सुटका केली. परंतु त्या दोन युवकास चोप देण्यासाठी नागरिक मोठ्या सं्ख्येने जमा झाल्यामुळे त्याच्याच दुकानात दोघांना कोंडून बाहेरून कुलूप लावून घेत पोलिसांनी माहिती दिली.
पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस उपनिरिक्षक संदीप काळे, अंमलदार राजाभाऊ कोल्हे हे पथकासह दाखल झाले. त्या दोन युवकांना कोंडून ठेवलेल्या दुकानाबाहेर जवळपास २०० ते २५० लोकांचा जमाव जमला होता. या जमावात त्या युवकांना ताब्यात घेणे पोलिसांना कठीण झाले असते, जमाव बेकाबू होऊन त्या दोघांना मारहाण करण्याच्या तयारीत असल्याने विपरित घटना घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत होती. परंतु पोलिसांनी प्रसांगवधान राखत अनुचित प्रकार न घडू देता दोन युवकांना ताब्यात घेतले.
गर्दीला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार
घटनास्थळी तणाव वाढत असतानाच सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांनी आपल्या ‘डबल डिग्रीचा’ व दांडग्या अनुभवाच्या जोरावर परिस्थिती हाताळली २०० ते २५० च्या गर्दीला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करत जमावाला पिटाळून लावले. यावेळी राजाभाऊ कोल्हे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांनी मोठ्या हिमतीने २०० ते २५० लोकांच्या गर्दीतून शटर उघडून त्या संशयीत दोन युवकांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. अल्पवयीन मुलीचे आई-वडिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते, तर मुलीच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बजाजनगरात ठिकठिकाणी छेडछाडीचे प्रकार
शाळा, महाविद्यालये व महाराणा प्रताप चौकात, मीनाताई ठाकरे चौकात बर्याच दिवसांपासून काही उनाड तरुण विनाकारण थांबून शालेय मुलींना व येणार्या-जाणार्या महिलांची छेड काढतात. हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याने पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवून अशा तरुणांना कायद्याचा धाक निर्माण करणारी कार्यवाही करावी, जेणेकरून परिसरात छेडछाडीचे प्रकार होण्यास आळा बसेल.