

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात (दि २७) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बजाजनगर येथील महात्मा फुले स्मारक मोहटादेवी मंदिर जवळ हळदीकुंकवाचा कार्यक्रम (दि २६) रोजी आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना बोलावण्यात आले होते, परंतु या कार्यक्रमात वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल बोलतांना वादग्रस्त वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा एक व्हिडिओ वायरल झाला आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात मराठा समजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलिस निरीक्षक गाडे यांना निवेदन दिले, याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी नितीन देशमुख, उमेश दुधाट, औदुंबर देवडकर, हितेश पाटील, विक्रम आळंजकर, दिनेश दुघाट, अमोल तांगडे, गणेश सूर्यवंशी, अमोल काळे, अनिता पाटील, विष्णू पवार, निलेश पेरे यांचासह आदींची उपस्थिती होती.
*****
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 10 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न