April 19, 2025
Screenshot

Screenshot


वाळूजमहानगर – वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दि २४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीने आलेल्या नैराश्यातून शनिवारी (दि.25) रोजी सकाळी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आरोपीवर घाटीत उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात राहणाऱ्या व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीने आरोपी रवी राजू मोरे या 25 वर्षीय तरुणाविरुद्ध दोघांचे सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची व वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी रवी मोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रवी मोरे याने आमचे एकमेकांवर प्रेम होते. प्रेयसीने धोका दिला. त्याच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे.
गुन्हा दाखल झाल्याने रवी मोरे याला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून रवी राजू मोरे या तरुणाने राहत्या घरी शनिवारी (दि.25) रोजी सकाळी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने विषारी औषध सेवन केल्याचे समजताच तात्काळ घाटीत उपचारार्थ हलवण्यात आले. त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!