
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : पंजाब राज्यात अमृतसर या शहरातील मुख्य चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्या प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाळूज महानगर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने निषेध व्यक्त करत विटंबना करणाऱ्या समाजकंटकाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आले. यावेळी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी निवेदन स्वीकारत सर्व अनुयायांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले.
निवेदनावर काकासाहेब गायकवाड, अशोक वाहूळ , प्रकाश निकम, गौतम मोरे , आकाश वाघ, चेतन सोनवणे ,सुर्यकांत पठारे , मंगेश काशिंदे विनोद वाकोडे , किशोर दांडगे , नामदवे केदारे, सचिन जमधडे , राजु भालेराव , संदीप जगताप, विनोद दाभाडे, नारायण हिवाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
****
-
तलवार–सुरा घेऊन दहशत माजवणारा परवेज पोलिसांच्या जाळ्यात
Share Total Views: 38 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/वाळूज महानगर जोगेश्वरी परिसरात हातात तलवार आणि सुरा घेऊन
-
लाडक्या बहिणींना दिलासा! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ
Share Total Views: 40 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे) न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे) छत्रपती
-
“पीएमओ सचिव” बनून फसवणूक करणारा बीडचा तरुण अटकेत!
Share Total Views: 15 वाळूज MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई – साथीदारासह बेड्या न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/वाळूज



