

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरातील वाळूज औद्योगिक क्षेत्रातील वडगाव कोल्हाटी व रांजणगाव शेंपू. अशा दोन ठिकाणी दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्या आहे. प्रभाकर दत्तात्रय बिडवे वय ४० रा पळशी ता सिल्लोड, ह मु बजाजनगर, तर जगन भिकाजी दराडे वय ४८ रा किनखेडा ता कारंजा जि वाशिम ह मु. विवेकानंद कॉलोनी रांजणगाव शेपू अशा गळफास घेतलेल्या दोन्ही व्यक्तींचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर बिडवे हे बजाजनगर येथे कुटुंबासह राहतात त्यांना दोन मुलं आहेत, ते वडगाव येथील श्रीकांत वाघ यांच्या साई जेंट्स पार्लर येथे दोन वर्षापासून काम करतात. दि २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास श्रीकांत वाघ हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना आतून दुकान बंद असल्याचे निदर्शनास आले त्यांनी बराच वेळ आवाज देऊनही कुणी आतून दुकान उघडत नसल्याने त्यांनी दुकानावर जाऊन एक पत्रा उचकटून बघितला असता त्यांना गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर बाहेरून दुकानाचे शटर उचकटून आत बघितले असता प्रभाकर बिडवे यांनी गळफास घेतल्याचे दिसले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात अली, पोलिसांनी तत्काळ घाटी दवाखाना येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर दुसऱ्या घटनेत दि २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जगन दराडे यांनी राहत्या घरी दोरीच्या सहायाने गळफास घेतला. त्यांनाही नातेवाईकांनी तत्काळ घाटी दवाखाना येथे दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. परंतु दोन्ही घटनेत दोन्ही व्यक्तीनी गळफास का घेतली हे कारण समजू शकले नाही. पोलिस तपास करीत आहे.
****
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 11 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 9 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न