April 19, 2025
5fbc49ce-f31a-465e-a39d-3de8d4e63b96

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरातील रांजणगाव शेणपूंजी येथील महादेव मंदिर व बजाजनगरातील शनिमंदिरातून पितळाचे साहित्य चोरी करणाऱ्या आरोपीला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून २ लाख १७ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजगाव शे पु येथील महादेव मंदिरातून महादेवाच्या पिंडीवरील २ किलो वजनाचा पितळी नाग चोरी झाल्याची तक्रार मंदिराचे विश्वस्त गंगाराम लक्षण हिवाळे यांनी दि १० जानेवारी रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. या चोरीचा तपासपोलीस करत असतांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी चंद्रकांत तुकाराम सातपुते वय २१ रा मुळगाव सोनवळा ता अंबेजोगाई जि बिड ह मु . कमळापूर ता गंगापूर याने ही चोरी केल्याचे पोलिसांना माहिती मिळाली त्याला रांजणगाव येथून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपीने अजून बजाजनगरतही शनिमंदिरातून पितळी साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान मंदिरामध्ये चोरी केलेले पितळाचे साहित्य हा आरोपी मोहम्मद आरेफ खान पाशाखान मुजीब रहीम शेख रा विटावा ता गंगापूर यांना विकल्याने त्यांनी गुन्हातील आरोपी करण्यात आले आहे.

ही कामगिरी मा. प्रविण पवार, पोलीस आयुक्त, मा. पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, रामेश्वर गाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि / मनोज शिंदे, पोउपनि/ श्री प्रविण पाथरकर, श्रेणी पोउपनि / दिनेश बन, पोह/ धिरज काबलिये (तपास अधिकारी) शिवनारयण नागरे, गणेश सागरे, रोहित चिंधाळे, हानूमान ठोके, यशवंत गोबाडे, समाधान पाटील, मनमोहनमुरली कोलमी, संजय बन्सोडे, बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.

*****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!