
Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर : बजाजनगरातील साई श्रधा पार्क येथील राहणारे चेतन गुरासे वय २३ यांना दि २१ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास तिघांकडून टोक्यात बियरची बॉटल मारून मोबाईल हिसकावत मारहाण केली होती. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गणेश दिनकर गणगे वय २४, मुकेश रावसाहेब गोरे, वय २४, अविनाश शाम कुलाल वय २२ तिघही राहणार रांजणगाव शेपू. या तीनही आरोपींना अटक केली असून कोर्टाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कामगिरी ही मा.श्री प्रविण पवार, पोलीस आयुक्त, मा. पोलीस उप आयुक्त श्री नितीन बगाटे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. महेंद्र देशमुख, श्री रामेश्वर गाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि / श्री मनोज शिंदे, श्रेणी पोउपनि / श्री दिनेश बन, पोह/ बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, मनमोहनमुरली कोलमी, संजय बन्सोडे, समाधान पाटील, हानुमान ठोके, गणेश सागरे, यशवंत गोबाडे, यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.
****
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 10 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न