July 7, 2025
e27cb27d-139d-4f38-8769-afab6b8178dc

न्युज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर – रांजणगाव येथील पवननगरमध्ये राहणाऱ्या आनंद सुरेश लोखंडे वय २५ याने पत्नी ममताच्या चरित्रावर संशय घेऊन तिचा गळा दाबून खून केला होता ही घटना दि २० जुलै २०१९ रोजी सकाळी घडली होती. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता, या गुन्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चासकर यांनी करून सबळ पुरावे जमा करून दोषपत्र दाखल केले होते, मा. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल लावत आरोपी आनंदला जन्मठेप व ३ हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्याचे कामकाज सरकारी वकील एन एस जगताप यांनी पाहिले असून त्यांना कोर्ट पैरवी अधिकारी सफौ. दत्ता गवळी, यांनी मदत केली. आरोपी तर्फे श्री ए.ए. बांगर वकील यांनी कामकाज पाहिले. सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान कोर्ट पैरवी अंमलदार यांना श्री रामेश्वरा गाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांनी मार्गदर्शन केले.

————-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!