April 19, 2025
1e015fed-1e9a-41ae-a5c8-43285313d66e

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगरातील बजाजनगर व सिडको परिसरात शटर उचकटून चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने अटक दि १३ जानेवारी रोजी अटक केली आहे. शेख सिराज शेख सईद वय २१, शेख सोहेल शेख मजहर वय २५, दोघेही रा कासंबरी दर्गाजवळ, छत्रपती संभाजीनगर, असे दोन्ही आरोपींचे नाव आहे त्यांचाकडे एकूण २ लाख ४ हजार ५९५ रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि १२ जानेवारी रोजी रात्री पहाटे या दोन्ही चोरट्यांनी मेडिकल, किराणा दुकान असे ५ शटर उचकटून चोरी करून धुमाकूळ घातला होता. या दोन्ही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्यांच्या मागावर असतांना छत्रपती संभाजीनगरातील गुन्हे शाखेने त्यांना अवघ्या काही तासात पाडेगाव मधील एका हॉटेलमधून ताब्यात घेऊन अटक केली त्यांचेकडून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ही कारवाई मा.श्री.प्रविण पवार, पोलीस आयुक्त मा.श्री. प्रशांत स्वामी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा.श्री. सुभाष भुजंग, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली संदीप गुरमे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा, प्रविण वाघ पोलीस उप निरीक्षक, पोह/विजय निकम पोअं/मनोहर गिते, कृष्णा गायके, विजय भानुसे, संतोष चौरे, सोमनाथ दुकळे, मपोअ/संजवणी शिंदे. यांना पार पडली.

******


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!