July 7, 2025
537c9ddf-49a9-4308-ac06-562e31e1ab3e

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा साहित्य परिषद आणि दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४४
वे मराठवाडा साहित्य संमेलन दिनांक १५ व १६ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरे होत आहे. गेल्या अनेकवर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेचा हा उपक्रम मराठवाड्यातील लेखक, साहित्यिक, कवी, कथाकार यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो. यानिमित्ताने वाळूज परिसरातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीस बळ मिळणार आहे. या संमेलनासाठी दगडोजीराव देशमुख महाविद्यालय हे संयोजक असून त्यांच्या वतीने विशेष बोधचिन्हाचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा.ना. संजय शिरसाट यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या विशेष बोधचिन्हांमध्ये वाळूज औद्योगिक दर्शन, मराठवाड्यातील शेती, श्रम, संस्कृती आणि कैलास लेणे अशा सांकेतिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. बोधचिन्हांच्या अनावरणप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय राऊत, स्वागत मंडळाचे विवेक जैस्वाल, सुनील काळे, गणेश घुले, शशिकांत ढमढेरे, मच्छिंद्र सोनवणे, विजय जैस्वाल, मनीष जैयस्वाल प्राचार्य डॉ राहुल हजारे आदी उपस्थित होते.

******


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!