

वाळूज महानगर : सुख दुःखात सहभागी होऊन जमेल तशी मदत करणारे, आंबेडकरी चळवळीचा तरुण तडफदार ढाण्या वाघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संघटक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्य अत्याचार कृतीविरोधी समितीचे मुख्य समन्वयक प्रवीणअप्पा भीमराव नितनवरे यांचे वयाच्या पन्नासव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच भाऊ तीन बहिणी, आई पत्नी मुलगी व दोन मुले नातवंड असा मोठा परिवार होता. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी नरसापुर ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अचानक ह्रदय विकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांच्यासोबत असलेल्या अशोक वाहूळ व प्रकाश निकमयां कार्यकर्त्यांनी क्षणाचा विलंब न लावता त्यांनी तातडीने शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केले असता प्रवीणअप्पा नितनवरे यांना शासकीय रुग्णालया घाटी येथे दाखल केले असता त्यांना सकाळी १०.३० वाजता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
प्रवीण अप्पा नितीनवरे यांना आंबेडकरी चळवळीने झपाटले असल्याने ते जास्तीचा वेळ समाजासाठी देत होते अतिशय कमी वेळ ते आपल्या कुटुंबांना देत होते. कोरोनाच्या काळात अनेक रुग्णांना त्यांनी मोफत भोजनदान,औषधी देण्याचे मोठे कार्य केले होते. अनेक बुद्ध विहार बनवण्यामागे प्रवीण अप्पा यांचा सहभाग होता. अनेक गोरगरिबांच्या मुला मुलींचे लग्न सुद्धा अप्पानी लावून दिले, आंबेडकरी चळवळीच्या तरुणावर किंवा कुटुंबावर हल्ला झाला तर आप्पा तातडीने त्या ठिकाणी धावून जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते. असा हरहुन्नरी कार्यकर्ता आज समाजातून काळाच्या पडद्याआड गेला त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याच्या भावना आज प्रत्येक कार्यकर्ता पुटपुटत होता आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होता.
प्रवीणअप्पा नितनवरे यांनी आपल्या मूळ गावी पूज्य भन्ते खममसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावातील बुद्ध विहारांमध्ये सुंदर बुद्धांचे शिल्प तयार केले आहे. प्रवीण आपण नितनवरे यांनी अनेक संघटना, वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये उत्कृष्ट कार्य केले.
प्रवीण अपाच्या अकस्मात निधनाने संपूर्ण जिल्ह्यात वनव्या सारखी बातमी पसरली आणि सर्वांनी एकमेकांना फोन करून नरसापुर येथे आप्पांना शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गंगापूर तालुका, वाळूज महानगरातील संपूर्ण गावातील आप्पांचे हितचिंतक उपस्थित राहून सर्वांनी साश्रू नयनांनी निरोप दिला यावेळी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कदम, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे ज्येष्ठ नेते दिनकर दादा ओंकार, शिवसेनेचे कृष्णा पाटील डोणगावकर, आदींनी आप आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पूज्य भन्ते सुदत्तबोधीयांच्या हस्ते अंत्यसंस्कार विधी ग्रहण करण्यात आला यांनी यावेळी सुमारे पाच ते सहा हजार नागरिक उपस्थित होते.
****
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 11 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न