July 8, 2025
Screenshot

Screenshot


न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : बजाजनगर मध्ये कालची चोरीची घटना ताजी असतांना आज पुन्हा बजाजनगरमध्ये चोरट्यांनी ५ शटर उचकटून चोरी झाल्याची घटना दि १२ रोजी सकाळी उघडकीस अली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बजाजनगरमध्ये जयभवानी मधील कालची चोरीची घटना ताजी असतांना पुन्हा चोरट्यांनी सिडको मधील देवगिरी नगरमध्ये संतोष गोविंद कदम यांचे किराणा दुकान असून त्यामधून ४ ते ५ हजार रुपये चोरी झाल्याचे कदम यांनी सांगितले आहे. बाजूलाच असलेले रवी आप्पासाहेब जाधव यांचे तुळजाई मेडिकल, लोकमान्य चौक येथील देवगिरी सूपर मार्केट उचकटून चोरीचा प्रयत्न केला तर सागर पितांबर शिंदे यांचे मातोश्री मेडिकल मधुल रोख ८-१० हजार आणि कॉम्प्युटर चोरी झाल्याचे शिंदे यांनी सांगितले तर, प्रसन्न एंटरप्राइजेस या दुकानातील ८-१० मोबाईल, रोख १० हजार, ३२ इंची २ टिव्ही, ट्रिमर, स्मार्ट वॉच असे जवळपास २ लाखांचा उद्देमाल चोरी झाल्याचे प्रमोद मुनोत यांनी सांगितले. या सर्व घटनांचा पोलीस तपास करत आहे.

सिडकोमध्ये पोलीस चौकीची मागणी

वाळूज महानगरातील वाढत्या घटना बघता नागरिकांनी पोलिस चौकीची मागणी केली आहे. महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी यावर लक्ष द्यावेत अशीही मागणी तेथील महिलांनी केली आहे.

******


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!