July 8, 2025
Screenshot

Screenshot


न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज कडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका बोलेरो पिकअपमध्ये ८ गायी कत्तलीसाठी घेऊन जाणारा पिकअप वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून एकाला अटक केली आहे. ही कारवाई आज दि ७ रोजी सकाळी ८:३० वाजता करण्यात अली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूजकडून छत्रपती संभाजीनगरकडे एक बोलेरो पिकअप एम एच २० जिसी ८१७६ गाडी कत्तल करण्यासाठी गायी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचत कामगार चौक येथे ८ गायीसह, बोलेरो पिकअप व चालकाला ताब्यात घेतले, शोहेब अहेमद कुरेशी वय २२ रा शिल्लेखना, छत्रपती संभाजीनगर असे चालक आरोपीचे नाव आहे. दरम्यान ह्या छोट्याशा गाडीमध्ये निर्दयीपणे ८ गायी घट्ट दोरीच्या सहायाने बांधलेल्या होत्या. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अली असून या गायी चिकलठाणा येथील गोशाळा येथे पाठवण्यात आल्या आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

******



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!