July 7, 2025
Screenshot

Screenshot


न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरातील तिसगाव येथील खवडा डोंगरावरून चुलत भावानेच १७ वर्षीय बहिणीला ढकलून देत खून केल्याची घटना दि ६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नम्रता ही शहागड ता अंबड जि जालना येथे राहते तेथील एका मुलासोबत प्रेम संबंध होते, ते घरच्यांना मान्य नसल्याने तिची समज आई वडिलांनी घातली होती, तरीही ती ऐकत नसल्याने तिला काका तान्हाजी शेरकर रा वाळदगाव जि छत्रपती संभाजीनगर येथे साधारण ६-७ दिवसापूर्वी आणण्यात आले. आज चुलत भाऊ ऋषिकेश यांनी तिला समजूत घालत तिसगाव येथील खवडा डोंगर येथे साधारण २०० फूट उंचावर नेले व तेथून ढकलून दिले, ही घटना तेथील क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात अली व पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्यासह बाबासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, सुरेश कच्चे, इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत, जखमी मुलीला घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आरोपी ऋषिकेश याचावर सातारा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न कलम, ३०७,३२४ यासारखे गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी आरोपी ऋषिकेश ला अटक केली असून पुढील तपास करत आहे.

*******


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!