July 8, 2025
Screenshot

Screenshot


न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
छत्रपती संभाजीनगर : नेहमी दबंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या पथकांसह पुन्हा एकदा प्रतिबंधित असलेला तब्बल ७२ लाखांचा गुटखाचा ट्रक जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दि २ डिसेंबर रात्री करण्यात आली. त्यामुळे प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २ रोजी उपआयुक्त बागते यांना प्रतिबंधित असलेला गुटखा धुळे- सोलापूर रोडकडून साजापूरकडे जाणार असल्याचे खात्रीलायक माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी उपआयुक्त बगाटे यांचा मार्गदर्शनाखाली पथक तयार करून सापळा लावला असता गुटखाने भरलेला एक ट्रक, एका कारसह मोहम्मद शफीर मोहम्मद सादिक (४६) रा नागपूर गेट अमरावती, तहेर खान रईद खान (३७) रा बडनेरा अमरावती, अनीस रफिक शेख, (३७) किरडपुरा छ. संभाजीनगर या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये ६० लाख ६६० रु किमतीचा बाजीराव पान म्हसाला, १२ लाख १३२ रु किंमतीचा मस्तानी पान म्हसाला, २२ लाख किमतीचे एक ट्रक व कार, १५ हजार रु किमतीचे तीन मोबाईल असा एकूण ९४ लाख १५ हजार ७९२ रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त, प्रविण पवार,पोलीस उपआयुक्त, नितीन बगाटे,मा. सहा. पोलीस आयुक्त, छावणी विभाग महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली कृष्णा शिंदे, पोलीस निरीक्षक सपोनि मनोज शिंदे, पोउपनि प्रविण पाथरकर, पोउपनि दिनेश बन, पोह. सुरेश कचे, पोह. जालीधर रंधे, पो.अं. पो. अं.विशाल पाटील, पो. अं. नितीन इनामे पो.अं. समाधान पाटील, पो. अं. योगेश शेळके, पो.अं. किशोर साबळे, पो. अं. शिवनारायण नागरे, पो. अं. बबलु थोरात यांनी पार पाडली आहे. तसेच आरोपींना ७ जानेवारी पर्यंत पोलीस कष्टडी मिळाली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे हे करीत आहे

*************


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!