

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरातील वाळूज वाहतूक कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना दोन व्यक्तींनी विनाकारण हुज्जत घालत लाथाबुक्यांनी मारहाण केली, नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्याला त्यांच्या तावडीतून सोडवले, ही घटना एनआरबी चौकामध्ये दि २ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली, याप्रकरणी दोन आरोपींवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अशोक उत्तमवराव थोरात हे वाळूज एमआयडीसी येथील एनआरबी चौक येथे आपले कर्तव्य बजावत असताना सायंकाळी ६.१० वाजता, दोन व्यक्ती अचानक थोरात यांचाजवळ येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात करून त्यांच्या घातलेल्या शासकीय गणवेश फाडून लथाणुक्यांने मारहाण करण्यास सुरुवात केली. परंतु मारहाणीमध्ये खाली पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला नागरिकांनी त्यांच्या तावडीतून सोडवले. घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना देण्यात अली त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अंकुश रामदास आहेर वय ३६ रा शिवाना ता सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर ह मु वडगाव कोल्हाटी अयोध्या नगर व नामदेव लक्ष्मण खंबाट वय ४६ रा म्हसला टाकळी ता सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर ह मु गिरिराज हाउसिंग सो कामगार चौक वाळूज या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन थोरात यांच्या फिर्यादीवरून भा. न्या. सं. कलम 132, 121(2), 115(2), 352, 351(3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस करत आहे.
***********
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 11 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न