

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील वडगाव- तिसगाव रोडवरील नायरा पेट्रोल पंप जवळ भरधाव वेगाने आलेल्या कारणे दुचाकीला धडक दिलने दुचाकीवरून एका महिलेचा मृत्यू झाला तर इतर २ जण गंभीर जखमी आहे. ही घटना दि २८ रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली. आशामाती राजाभाऊ घुले वय ४५ रा गट नंबर ६ वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार क्र एम एच १२ एस एल ४५०२ तिसगाव कडून वडगाव भरधाव वेगाने जात असताना नायरा पेट्रोल पंप समोर येताच भाजीपाला खरेदी करून आशामाती घुले, रेखा सुरवसे व सुभाष सुरवसे हे मोपेड दुचाकीवर ट्रिपल शिट बसून रस्ता ओलांडत असताना अपघात झाला त्यात रेखा सुरवसे व सुभाष सुरवसे हे गंभीर जखमी झाले तर आशामाती घुले यांचा मृत्यू झाला. कारचालक ज्ञानेश्वर सोनाजी चाटे रा गट नंबर शरणापूर छत्रपती संभाजीनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर वाचला असता महिलेचा जीव
वडगाव – तिसगाव या रस्त्यालगत काही छोट्या व्यावसायिकांनी पत्र्याचे शेड उभारून दुकान टाकले आहे, ग्राहक येण्यासाठी त्यांनी दुभाजक तोडून रस्ता केला होता. याची कल्पनाही नागरिकांनी सिडकोअधिकाऱ्यांना दिली होती परंतु कुणीही त्याला प्रतिसाद न दिल्याने तेथून नागरिकांची ये-जा सुरू होती. त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे. हे लक्षात येताच तेथील नागरिकांनी रात्री तो रस्ता बंद केला. तो वेळीच बंद केला असता तर महिलेचा जीव वाचला असता असे नागरिकांचे म्हणणे आहे.
******
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 11 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न