July 8, 2025
Screenshot

Screenshot


Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील नांदेडा येथील शेतवस्तीवर चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून चांगलाच धुमाकूळ घातला जबरी चोरी केली आहे. ही घटना दि २६ रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव शिवाजी मते (३५) हे नांदेडा ता गंगापूर येथे कुटुंबासह राहतात वडील शिवाजी मते हे बाहेरगावी गेल्याने तिथेच मुक्कामी होते तर घरी आई, पत्नी व मुले होते. सर्वजन रात्री ९ वाजेच्या दरम्यान झोपी गेले. दि २६ रोजी पहाटे २.३० वाजेच्या दरम्यान सर्वजण झोपेत असताना दरवाजा लागलेली लाकडी फळी बाजूला काढून चोरट्याने दरवाजाची आतून कडी उघडली, आवाजाने उद्धव मते यांना जाग अली तेव्हा त्यांना तोंडाला रुमाल बांधलेले अंदाजे ३० वर्ष वय असलेले तीन चोरटे दिसले त्यांना कोण आहे हे विचारताच त्यातील एकाने चाकू दाखवत ‘चुपचाप बैठ, और सब पैसे,गहणे निकाल के डे, नाही तो सबको मार डालेंगे’ असा दम दिला. दरम्यान आवाजाने घरातील सर्वजण जागे झाले, भीतीपोटी कुणालाही आवाज करता आला नाही, चाकूच्या धाकाने घरातील व अंगावरील दागिने चोरट्यांनी बळजबरीने चोरून पळ काढला, त्यात १० ग्राम वजनाचे मंगळसूत्र, ७ ग्राम वजनाचे मंगळसूत्र, ८ ग्राम वजनाचे मंगळसूत्र, १५ ग्राम वजनाचे कामातील झुंबर, २ ग्राम वजनाच्या बाळ्या, ३ ग्राम वजनाचे कुडके, व ४२ हजार रोख असा एकूण १ लाख ७७ हजार रुपयाचे दगदगिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

*****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!